01 | योजनेबद्दल सविस्तर माहिती
✓ उद्देश:
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांचा घराचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना शासन निर्णय 15/11/2008 नुसार सुरु केली आहे.
✓ कागदपत्रे:
रमाई घरकुल योजना 2022 अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थीने सादर करवयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:
1. ७/१२ चा उतारा
2. घरपट्टी / पाणीपट्टी / वीज बिल (कोणतेही एक)
3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
4. उत्पन्नाचा दाखला
5. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
6. मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / पॅन कार्ड
✓ रमाई आवास योजना अटी:
● लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा.
● लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.
● लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
● लाभार्थी कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु. 1 लक्ष राहील.