• grampanchayat.bhugaon2013@gmail.com
  • Mon to Fri : 9:45 am to 5:00 pm
  • Social

१५ वित्त आयोग

15 वा वित्त आयो
✓ योजनेबद्दल सविस्तर माहिती

योजनेचे स्वरुप:
ग्रामविकास व जलसंधारण विभागातील शासन निर्णय 26 जून 2020 नुसार, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या कालावधीत केंद्रशासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला दोन प्रकारचे अनुदान मिळणार आहे:
● मुलभूत/ बेसिक अनुदान (अनटाईड)
● बंधित / टाईड अनुदान
सदर अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांवर वितरित केले जाणार आहे. निधीची परिगणना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळावर आधारित आहे. दोन प्रकारची अनुदाने 50% – 50% प्रमाणात विभागली आहेत.
✓ योजनेची कार्यपद्धती:
ग्रामपंचायतींनी 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीखालील शासन मार्गदर्शनानुसार वापरावा. कार्यपद्धती पत्र क्रमांक जा.क्र.ठाजिप/ग्रापं/227 दिनांक 5.11.2020 नुसार स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
✓ पंचायत राज संस्थांनी करावयाच्या मुख्य बाबी:
मुलभूत / अनटाईड (Aun-Tied) अनुदान:
● कर्मचारी पगार व आस्थापना विषयक बाबी वगळून स्थानिक गरजांनुसार खर्च.
बंधित / टाईड अनुदान:
● स्वच्छता, ODF दर्जा राखणे, पेयजल, जल पुनर्भरण, पावसाचे पाणी साठवण.
● 50% निधी स्वच्छता व 50% निधी पाणी संबंधित सेवांसाठीच बंधित.
✓ बंधित निधीमधून सर्वसाधारण कामे:

1) स्वच्छता व हगणदारीमुक्त उपक्रम:
● सार्वजनिक शौचालय बांधणे / दुरुस्ती
● बंदिस्त नाली
● कंपोस्ट खत / गांडूळ खत तयार करणे
● शोषखड्डे
● वॉश बेसिन, धोबी घाट
● गोबर गॅस
● प्राथमिक शाळा, अंगणवाडी शौचालये
● घनकचरा व्यवस्थापन – घंटागाडी
● मंदीर, बाजार, बसस्थानक सार्वजनिक शौचालय
2) पाणीपुरवठा योजना:
● नळ पाणीपुरवठा विस्तार / नळ पाईप दुरुस्ती
● मोटार दुरुस्ती, विहिर दुरुस्ती
● RO plant बसविणे
● टाकी दुरुस्ती / नवी बांधणी
● स्टँड पोस्ट दुरुस्ती, तोट्या बसविणे
● नविन विंधन विहिर / हातपंप दुरुस्ती
● वॉटर मीटर बसविणे
● क्लोरीन डोझर बसविणे
● Hydro-fracturing / cementation तांत्रिक उपाय
3) पावसाचे पाणी साठवण व जल पुनर्भरण:
● Roof Water Harvesting
● माती बांध, शेततळे, सिमेंट बांध
● सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण
● बंदिस्त गटारे
● गाव तळ्यांची दुरुस्ती
✓ अबंधित निधीमधून सर्वसाधारण कामे:
● पेयजल व साठवण सुविधा
● मुलांचे लसीकरण, कुपोषण प्रतिबंध
● रस्ते दुरुस्ती व देखभाल
● पादचारी मार्ग बांधकाम
● LED / Solar Street Light
● स्मशानभूमी बांधकाम / देखभाल
● वायफाय नेटवर्क, सार्वजनिक वाचनालय
● उद्यान, खेळाचे मैदान
● Rural Haat (आठवडी बाजार)
● नैसर्गिक आपत्ती मदत कार्य
● शारीरिक तंदुरुस्ती साहित्य
● घनकचरा व्यवस्थापन
● ड्रेनेज व तुंबलेले पाणी व्यवस्थापन
● जैवविविधता नोंदवही तयार करणे
✓ अबंधित निधी मधून खर्च करण्यास मनाई असलेले विषय:
● एकाच योजनेवर दुबार खर्च
● मानधन, पगार
● समारंभ, सजावट
● T.A / D.A
● बक्षिसे / उद्घाटन
● गाडी खरेदी
● सांस्कृतिक कार्यक्रम
✓ गाव विकास आराखडे:
1) सन 2020-21 गाव विकास आराखडा
2) सन 2021-22 गाव विकास आराखडा
3) सन 2022-23 गाव विकास आराखडा
Grampanchayat Logo
🏠 भुगाव हे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेले एक गाव आहे, जे पुणे शहराच्या जवळ आहे .हे गाव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)अंतर्गत येते. चांदणी चौकापासून जवळ असल्यामुळे बावधन आणि कोथरूडला जोडलेले आहे.

कार्यालयीन कामकाज वेळ:
सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15

📞 महत्वाचे संपर्क
🏢 ग्रामपंचायत कार्यालय 8446088080
👮 तलाठी भाऊसाहेब 7709019424
👮 पोलीस पाटील 9960208888
🚓 पोलीस स्टेशन 8805008080
वायरमन 9881543290
📮 पोस्ट ऑफिस 9922376880
🔌 लाईनमन 9766356800
वैकुंठ रथ : 7507362215